माझं Tweet.....नविन वर्ष संकल्प - टाईम मॅनेजमेंट!

माझं Tweet…..नविन वर्ष संकल्प – टाईम मॅनेजमेंट!

Posted by: Nitin Potdar
Category: Business, Pragaticha Express Way
१ जानेवारी २०११:    सर्वप्रथम माझ्या मित्रांनो तुम्हाला नववर्षाच्या खुप खुप शुभेच्छा!
“वेळ कुणासाठीही थांबत नाही”  दरवर्षी ३१ डिसेंबरला नव्याने समजणारी गोष्ट!   ३१ डिसेंबरला सकाळची वृतपत्रे, बातम्या बघताना आपण नकळतपणे  भुतकाळात जातो, पण लगेच संध्याकाळ होताना दुसऱ्या दिवसाची म्हणजे १ जानेवारीची नव्या उमेदीने वाट बघतो!   सकाळी माईंड फ्रेश असतं!  मनात नव्या संकल्पना,  नविन दिशा आणि एका चांगल्या मुड मधे आपण असतो!  नव्हे असायलाच पाहिजे.
काल दुपारी अचानक पुण्याला जायचा योग आला.   पुण्याला जाताना शक्यतो मी स्वत:गाडी चालवतो,  पण निघताना थोडा कंटाळा आला, आणि परत Express way वर ३१ डिसेंबरच ट्रॅफिक असेल म्हणुन म्हटंल चला आज टॅक्सीने जाऊया.  दुपारी २.०० वाजता दादरच्या टॅक्सी स्टॅण्डवर जाऊन टॅक्सी केली, माझ्या बरोबर एक आजी आजोबा, एक २० वर्षाचा पुण्याचा तरतरीत मुलगा – अमोल! आणि मी असा प्रवास सुरु झाला.
“बघता बघता २०१० केंव्हा संपला कळलं सुद्दा नाही!” आजोबांच पहिलं निराशेच्या स्वरातलं वाक्य.

“गेल्या दहा वर्षातल सगळ्यात वाईट वर्ष म्हणुन २०१०चा उल्लेख करावा लागेल, “स्कॅमपुर्ण-वर्ष” असचं त्याला संबोधलं जाईल.” आजोबांच दुसरं वाक्य.

“वेळ कुणासाठीच थांबत नाही! हो आजोबा” अमोलच पहिलं जोशपुर्ण उत्तर. “आणि चांगल किंवा वाईट या दोन्ही रिलेटिव्ह (relative) गोष्टी आहेत. आपण जास्त दुनियेचा विचार कशाला करायचा?” अमोल.
या दोन वाक्यावरून पुढची चार तास काय चर्चा होणारं हे जवळपास नक्की झालं होतं. मी शांत होतो. कुठल्याही विषयाच्या चर्चेत जेंव्हा दोन टोकं येतात तेंव्हा लगेच मत देणं टाळलेल बरं म्हणुन मी गप्प होतो!  अमोलचं उत्तर थोडं आजोबांना खटकलं असेल म्हणुन विषय बदलत…
“तुम्ही काय करता?” असा मी आजोबांना प्रश्न विचारला.   मग ओळखं झाली.  पुण्यात दादोजी कोंडदेवांच्या पुतळ्याच्या राजकारणा पासुन ते नंतरच्या बंद पर्यंत, मग मुंबईची गर्दी, ट्रॅफिक जॅम, कचरा, अशा मनाला क्लेशदायक विषयांवर सुमारे एकतास चर्चा.   सगळं खुपच निगेटिव्ह आहे मी म्हटंल.    आजोबांनी शेवटी या देशाच काहीही होणार नाही हा निष्कर्ष काढला आणि सगळे विषय संपवले!  इतक वेळ आमचं बोलणं एकणारा अमोल त्याच्या SMSs मधे गर्क होता.
आता मी मोर्चा अमोलकडे वळवला.  थोडं विषयांतर व्यावं म्हणुन “अमोल तुझं न्यु इयर रेझल्युशन म्हणजे नविन वर्षाचा काय संकल्प आहे?” अस त्याला विचारलं.   एक मोठ स्माईल देतं तो म्हणाला “त्यासाठीच SMSस चालु आहेत सर!”

“लोक काय वाटेल ते ठरवतात” तो म्हणाला.  म्हणजे?

“सिगरेट व दारू सोडणे, रात्रीच्या पार्ट्या बंद, व्यायाम करणे, काहीतरी नविन शिकणे, नविन मित्र जोडणे वगैरे वगैरे…..!  हे काय न्यु इयर रेझल्युशन झालं.  हे तर म्हणजे प्रत्येकाच्या आवडीनुसार ठरवायच्या गोष्टी आहेत. त्यासाठी संकल्प वगैरे…. म्हणजे खुपचं झालं.”  अमोल.

हे बोलत असताना माझ्या हातात महाराष्ट्र टाइम्स होता, त्यात तरूणांचे नविन वर्षाचे संकल्प वाचुन खरचं खुप बरं वाटलं.  कुणी  कॉलेजच्या एनएसएसमधे भाग घेणार आहे, तर कुणी गॉसिपिंग कमी करण्याचा संकल्प केलाय, कुणी कट्यावर कमी बसण्याचा, तर कुणी चक्क लेक्चर्स व्यवस्थित अटेण्ड करण्याचा!

“मग तुझ्या मते नविन वर्षाचा संकल्प काय असायला पाहिजे?” मी विचारलं
“……या वर्षी कुठलीही फालतुगिरी करायची नाही ठरवलंय!  वेळ वाचवायचा बसं इतकचं आज तरी ठरवलयं”   मला त्याच कौतुक वाटलं, मी पुन्हा त्याला विचारलं.  “अरे बॉस मला समजेल अशा भाषेत बोलना…”
“सर.  बघा वेळ वाचवायचा म्हणजे दिवसातुन फक्त १ तास फेसबुक, ट्विटर, इमेल्स, ब्लॉगिंग, SMSs, मोबाईल फोन वगैरे….”  अमोल निर्धाराने बोलत होता.  “These things constantly plays on your mind without any gain!” अमोल मधेच इंग्रजीत बोलला.

म्हणजे?  पुन्हा मी प्रश्न विचारला.

“म्हणजे no wasting time on anything, specially on these electronic gadgets!”  अमोल म्हणाला.

“आयुष्यात काही तरी करायच असेल ना सर तर आपण एकदम focussed व्हायला पाहिजे बघां.  आपण फालतू गोष्टींवर किती वेळ आणि एनर्जी खर्च करतो.   कुठल्याही गोष्टींच व्यसन होता कामा नये!  कुछ बनने के लिये टाईम मॅन्येजमेंट उत्तम असली पाहिजे सर!.”  त्याने सांगितलं आणि प्रतिक्रियेसाठी माझ्या कडे बघितलं. मला त्याचं खरचं कौतुक वाटलं.
इतक्या लहान वयात या मुलांना इतकी समज कशी आली.  मनात म्हटंल मी अमोलच्या वयाचा असताना माझे कित्येक तास रुईया कॉलेजच्या कट्ट्यावर गेले असतील, ……असा विचार तेंव्हा माझ्या मानात का आला नसेल… कदाचित तेंव्हा मोबाईल, इन्टर्नेट, टिव्ही चॅनेल्स असली कुठलीच electronic gadgets नव्हती म्हणुन असेल…. जाऊदे!

“खुप छान”

“मी इतका focussed विचार कधीच केला नाही बॉस?”  मी म्हटंल.

“सर बस का….. ” अमोल गलात हसत म्हणाला.

“ठरलं सर या वर्षी एकदम फोकस्ड रहायचं आणि मुख्य म्हणजे वेळ वाचवायची बस्स…… क्षुल्ल्कं गोष्टींवर आपला वेळ आणि एनर्जी खर्च करायचा नाही……..Time management perfect करायचं………”  अमोल निर्धाराने बोलत होता.  मी कौतुकाने त्याच्या कडे बघितला, पाठीवर हात ठेवला आणि म्हणालो  “अमोल तुझा विचार खुपच “अमोल” आहे बघं.   I must congratulate you boss!  Lets begin……..from today…”

“From just now…….sir ” अमोल म्हणाला….

(PS:  याच महिन्याच्या सुरवातीला पॅरिस मधे भेटलेला श्रीनिवास कुलकर्णी असेल किंवा काल पुण्याला जाताना भेटलेला अमोल.  आजची पिढी खरचं खुप focussed आहे.   वेळचं चांगला उपयोग करणं खरचं गरजेच आहे.  आपण नविन वर्षाच्या संकल्पा करताना किती विचार करतो, आणि शेवटी ते पाळत नाही ते तर सोडाच!  तुम्हाला अजुनही नविन वर्षाचा संकल्प सुचला नसेल तर त्यात वेळ घालवु नका!  पटकन उठुन निदान दिवसभराचं प्लानिंग करुन कामाला लागा.  आणि या वर्षी “वेळ वाचवणे” हाच संकल्प करायला काय हरकत आहे.   किती साधा संकल्प आहे… म्हणुन मी सुद्दा माझं आजचं ट्विट आवरतो घेतो.. चला लेट्स स्टे फोकस्ड!  वेळ आणि एनर्जी दोन्ही वाचवूया…… आपल्यासाठी).

Nitin Potdar
Author: Nitin Potdar

Leave a Reply

Please Ask Your questions

2 Comments

  • Anonymous

    काल्ह करै सो आज कर, आज करै सो अब्ब ही एक टाईम मॅनेजमेंटच आहे.

  • खरच किती सुंदर संकल्प आहे…मी सुदा हाच संकल्प केलाय. time is really very precious, but some time least bothered ……thank u so much sir. या वर्षी मी माझ्या वेळेचा खुप चांगला उपयोग करून घेईन. मीना

This website uses cookies and asks your personal data to enhance your browsing experience.