केबीसीचा मास्टरमाइंड

केबीसीचा मास्टरमाइंड

Posted by: Nitin Potdar
Category: Uncategorized

केबीसीचा मास्टरमाइंड…

पुष्कर सामंत

एखाद्या कठीण प्रश्नाचं उत्तर सापडलं की लोकांना आनंद होतो. पण, उत्तरापेक्षाही मेंदूला झिणझिण्या आणणारा अवघड प्रश्न सापडला की त्याला आनंद होतो.  हा अवलिया कुणी असेल तर तो म्हणजे कुणाल सावरकर.  ‘कौन बनेगा करोडपती’ मधल्या ‘ कम्प्युटरजी’ मार्फत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांमागचा खरा ब्रेन आहे पुणेकर कुणालचा.  फक्त केबीसीच नाही तर अमेरिका, इटली, स्वीडन, जपानसारख्या देशांच्या दूतावासांसाठीही त्याने क्विझ कॉम्पिटिशन्स घेतल्या आहेत. नुकत्याच झालेल्या ‘ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस’ साठी शेक्सपिअरवर आधारित क्विझ कॉम्पिटिशन त्याच्या डोक्यातून निघालेली संकल्पना होती.

व्यवसायाने आर्किटेक्ट असणा-या कुणालला छंद आहे तोच मुळी प्रश्न तयार करण्याचा.  ‘ एखादा प्रश्न काढण्यासाठी उलटा विचार करावा लागतो. उत्तर माहित असतं पण तो प्रश्न कशाप्रकारे विचारायचा हे चॅलेंज असतं. त्याचप्रमाणे प्रश्न फार कठीण आणि अगदीच सोपा काढून चालत नाही.  त्यामुळे प्रश्न तयार करण्यात एक प्रकारची मजा येते,’ असं हा क्विझमास्टर सांगतो. पुण्यात जन्मलेल्या कुणालचं शालेय तसंच पुढचं शिक्षणही दिल्लीतच झालं.  ‘ स्कूल ऑफ प्लानिंग अॅण्ड आर्किटेक्चर’ मधून ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन कंपनीत आर्किटेक्चरिंगचा जॉब त्याने केला. २००२मध्ये मित्र आदित्य नाथ मुबाईसोबत क्वीझक्राफ्ट इव्हेण्ट्स अॅण्ड कम्युनिकेशन्स प्रा. लि. ही कंपनी त्याने स्थापन केलीय. कुणालने १९८९ मध्ये वयाच्या सोळाव्या वर्ती मध्यवर्ती गणेशोत्सवात पहिली – वहिली क्विझ कॉम्पिटिशन आयोजित केली होती.  महाराष्ट्र राज्य- संस्कृती, मराठी भाषा यावर आयोजित केलेल्या या ‘क्विझ शो’ चं तेव्हा खूप कौतुक झाल्याचं कुणाल सांगतो .

ग्यानदर्शन ‘आणि कोर्स डिझायनिंगसुद्धा

‘ कौन बनेगा करोडपती’ बरोबरच ग्यान गुरूसारखे क्वीझ शोचे प्रश्न त्याने तयार केलेत. त्याचबरोबर एनसीइआरटीच्या शाळा तसेच दूरदर्शन, डीडी ग्यानदर्शनसाठी शैक्षणिक क्वीझ कॉम्पिटिशन्स, लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड क्वीझ, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेससाठी शेक्सपिअर क्विझ कॉम्पिटिशन तयार करण्यातही त्याचा महत्त्वाचा वाटा आहे.   आकिर्टेक्चरिंग ही पॅशन असणा-या कुणालने इंटिरिअर डिझायनिंगचा कोर्सही तयार केलाय.   चंदीगडमधल्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन डिझाइनसाठी देशातला पहिला – वहिला बॅचलर्स ऑफ सायन्स इंटिरिअर डिझायनिंग हा कोर्स बनवण्याचं श्रेयही कुणाल सावरकरचंच.  आदित्य मुबाईसोबत त्याने हा नवा कोर्स तयार केला.

Nitin Potdar
Author: Nitin Potdar

Leave a Reply

This website uses cookies and asks your personal data to enhance your browsing experience.